नळदुर्ग :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु, मटका तसेच गुटखा विक्री सरासपणे होत असून तात्काळ अवैध बंद करावे, अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची एक प्रत माहितीस्तव नायब तहसिलरांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, उपतालुकाध्यक्ष अमोल मोटे, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, दादा वडणे, प्रमोद कदम, विनायक वडणे, राम वडणे, समीर शेख, एकनाथ शिरगिरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
