अक्कलकोट : रियाज सय्यद

अक्कलकोट तालुक्यातील वरदायिनी कुरनुर धरण विविध पक्ष्याचे नंदनवन बनत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून पक्षी निरीक्षण करत असताना विविध देशी विदेशी आणि अतिशय दुर्मिळ पक्षी भेट देऊन गेले आहेत.  चार वर्षांपूर्वी फ्लेनिंगो पक्षी पहावयास मिळते होते. आज या पक्ष्याचे कुरनूर धरण परिसरात आगमन झाल्याचे दिसून आले. 

याव्यतिरिक्त बीएनएचसने धोक्यात असलेला पेनटेड स्टॉक (चित्रबलाक) हे सुद्धा आलेले आहेत. अतिशय सुंदर, मनमोहक आणि फ्लेनिंगो पक्ष्यामध्ये सर्वात मोठा असलेला ग्रेटर फ्लेनिंगो या पक्षांचा युरोप, आफ्रिका आणि भारतात यांचा वास्तव आहे. सोलापूर जिल्ह्यात यांचे स्थानांतरण होत असतो. आकाराने 115 ते 150 सेमी असलेला एकावेळी एकच अंडी घालते. याचे खाद्य म्हणजे चोंचीमध्ये पाणी आणि माती घेतो आणि गाळण करून यामधील शंखशिंपले मधील जीव खात असतो. याचा वरचा जबडा हालचाल करत असतो याचा उपयोग खाद्य मिळवण्यासाठी होतो अलीकडच्या काळात जलप्रदूषणामुळे यांची संख्या घटत चालली आहे. यांना खाद्य मुबलक प्रमाणात मिळत असेल तर याच्या शरीरावरील लाल आणि गुलाबी रंग गडद दिसतो. प्रजनन काळात हा रंग जास्त उठून दिसतो. याचे चोंच आणि पाय गुलाबी रंगाचे असतात. 

याठिकाणी निसर्गप्रेमींनी एकत्रित येऊन पक्षीनिरीक्षणासाठी धरणाजवळ पर्यटन केंद्र उभा करावी जेणेकरून परिसरात रोजगार उपलब्ध होईल.

 
Top