काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील संदीप भारत महामुनी यांची पांचाळ सोनार महामंडळाच्या तुळजापूर तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बुधवार दि. (19) रोजी मोडनिंब (ता.माढा) येथे सोनार समाजाचे राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश पोतदार, महिला अध्यक्ष उज्ज्वला क्षिरसागर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आनंद क्षिरसागर, महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय क्षिरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोनार समाज बांधवांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते संदीप महामुनी यांची निवड करण्यात आली. पांचाळ सोनार समाजाचे एकमेव राज्यस्तरीय सामाजिक संस्था असून ही संस्था समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत असून यांनी माध्यमातून समाजाच्या विविध अडचणी सोडविणे, समाजाचे व्यवसायिक प्रश्न सोडविणे, नेतृत्व तयार करणे, शासकीय विविध योजनांची माहिती देणे असे विविध प्रकारचे कार्य असून संदीप महामुनी यांच्या निवडीमुळे सोनार समाजाचे प्रश्न मार्गी लागतील असे मत समाजाचे धनंजय क्षिरसागर यांनी व्यक्त केले. रविवार दि. (30) रोजी मोडनिंब (ता.माढा ) येथे उर्वरित कार्यकारणी पदाधिकार्यासह संदीप महामुनी यांना आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी महामंडळाचे राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश पोतदार, महिला राज्य अध्यक्ष उज्ज्वला क्षिरसागर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आनंद क्षिरसागर, राज्य अध्यक्ष धनंजय क्षिरसागर यांच्यासह सोनार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
