तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

मागील भांडणाची कुरापत काढून तालुक्यातील सिंदफळ येथे एकास काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना सोमवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलीस ठाण्यात चार जणावर  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

सिंदफळ येथील सोमनाथ तानाजी धनके हे बटईन केलेल्या शेताकडे रोड ने जात असताना धनाजी भानुदास धनके,तानाजी भानुदास धनके,भारत भानुदास धनके,भानुदास दत्तू धनके सर्व रा.सिंदफळ यांनी मागे झालेल्या भांडणाची कुरापत काढून रस्त्यात अडवून काठीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून बघून घेतो अशी धमकी दिल्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सोमनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून धनाजी भानुदास धनके,तानाजी भानुदास धनके,भारत भानुदास धनके,भानुदास दत्तू धनके सर्व रा.सिंदफळ यांच्या वर कलम ३४१,३२३,५०४,५०६,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top