नळदुर्ग :

नळदुर्ग येथे मोहरम सणानिमित्त विविध कमिटीच्यावतीने शरबतीचे वाटप करण्यात आले. तर शहरातू्न भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात बडे बाराईमाम, छोटे बाराईमाम, अब्बास अली, ईमाम कासीम, नाले हैदर, हुंडेनालसाब, अली अजगर, हुसेन बादशहा यांच्या सवारी (पंजे) बसविण्यात आले. त्यानंतर  5 ते 9 मोहरम दरम्यान दररोज एक किंवा दोन सवाऱ्या ( पंजे) उठवून मिरवणूक काढण्यात आली. शेवटी 10 मोहरम म्हणजे 21 सप्टेंबर रोजी सवारीची मुख्य मिरवणुक शहरात पार पडली. 

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यातील बडे बाराईमाम व छोटे बाराईमाम पंजे हे मानकरी पोलीस पाटील सुर्यकांत पाटील व बाहुबली शेटगार यांच्या उपस्थित उठवून करण्यात आली. त्यानंतर इतर सवाऱ्या उठविण्यात आल्या. त्यानंतर सर्वात शेवटी  हजरत सय्यद सादेख शहावल्ली चौकात सर्व पंजे एकत्र येवून अलीअजगर यांची सवारी (पंजा) उठविले. त्याच ठिकाणी सर्व पंजे एकमेकांची गळाभेट घेऊन सर्व सवाऱ्या पोलीस ठाण्यासमोरुन क्रांती चौक, बसस्थानक, नानीमॉ दर्गाह मार्गे बोरीनदी येथील करबला मैदान येथे पोहचून सवारी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 

मोहरमच्या पंज्यासाठी मकबुल हेकडखाने, मैनोद्दीन शेख, रहेमान कुरेशी, मैनोद्दीन सय्यद, नुरोद्दीन शेख, खमरोद्दीन शेख, नदीम शेख,अफसर शेख, कौसर शेख, शाहबोद्दीन शेख,जैनोदीन शेख, खालेद इनामदार,तोफीक कुरेशी, खय्युम कुरेशी, सय्यद शेख,सज्जाद सावकार, अबुबकर शेख, रशीद मुजावर, दानिश शेख, ईलाही बागवान आदींनी पुढाकार घेतले. 

भव्य पंजा मिरवणुकीत सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.  कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील विविध कमिटीच्या वतीने जागोजागी शरबतचे वाटप करण्यात आले. तर काहीजणांनी अन्नदान केले. 

 
Top