उस्मानाबाद :

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील श्री मारूती मंदिराच्या शिखर बांधकामाचे भूमिपूजन आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान महाराज हसेगावंकर व श्री रामानंद महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप राम महाराज काजळेकर यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) करण्यात आले. श्री मारुती मंदिराचे व भव्य शिखर कळसाचे काम लोकवर्गणीतून होणार असून यासाठी ३५ ते ४० लक्ष रुपये निधीची आवश्यकता आहे़.

सारोळा येथे श्री मारुती मंदिराचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून शिखर बांधकाम करण्यात येत आहे. तर मंदिरासमोरील सभागृहासाठी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी आमदार निधीतून १० लक्ष रूपयांचा निधी दिला आहे. या कामाचाही लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे. मंदिरावर लोकवर्गीणीतून आकर्षक शिखर उभारण्यात येणार आहे. या कामाचे शनिवारी विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, हभप ललत लिंगे, धैर्यधर पाटील, रमेश रणदिवे, पांडूरंग गुरव, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, बाळासाहेब देवगिरे, लिंबराज मसे, संदिपान देवगिरे, बबन मसे, निवृत्ती कुदळे, पत्रकार धनंजय पाडुळे, सोपान कोल्हे, अमर बाकले, सोपान कुदळे, हभप राजाभाऊ महाराज देवगिरे, मन्मथ स्वामी, धनंजय काळे, सुधाकर मसे,  रिपाइंचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, माणिक कुदळे, अंकुश सरगुले, दामाजी बोरकर, काका पाटील, अरूण कुदळे, नामदेव खरे, विठ्ठल कोळगे, जीवन बाकले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top