तुळजापूर : प्रदीप कुमार रा. हरीयाना, हषदिपसिंग रा. पंजाब, अंकीत पाल, रिंकु पाल, मानु पाल, सोनु कुमार, अजय पाल, कुलदीप पाल, मोनु कुमार सर्व रा. उत्तर प्रदेश या सर्वांना महसुल प्रशासनाने मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह, आंबेडकर भवन, तुळजापूर येथे कॉरंटाईन करुन ठेवण्यात आले होते. दि. 19.04.2020 रोजी 02.00 वा. सु. ते सर्व जण कॉरंटाईन कक्षातून निघुन गेले. अशा प्रकारे नमुद व्यक्तींनी जाणीवपुर्वक, निष्काळजीपणे कोरोना संसर्ग पसरण्याच्या कारणास जबाबदार होण्याची कृती केली आहे. अशा मजकुराच्या मंडळ अधिकारी, तुळजापूर श्री. अनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 19.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top