उस्मानाबाद, दि. १० : पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 95/2020 भा.दं.वि. कलम- 380 या चोरीच्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी- दादा बजरंग माने उर्फ लहु रा. काकानगर, उसमानाबाद यास स्था. गु. शा. चे पो. नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मार्लापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 10.04.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल फोन (किं.अं.5,000/-रु.) व रोख रक्कम 29,500/- रु. अशा एकत्रीत 34,500/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. ढोकी यांच्या ताब्यात दिले आहे.
