तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे पंतप्रधान गरीब कल्याण योजनाअंतर्गत एस.एस.गायकवाड व बी.डी.जगताप यांच्या स्वस्त धान्य दुकानामधुन दि. २१ रोजी मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

   देशभरात हजारो नागरीकांना कोरीना या संसर्गाने आपल्या विळख्यात घेतले आहे.या विषाणुचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ३ मेपर्यंत देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे.या लाॅकडाऊनच्या काळा मध्ये गरीब जनता उपाशी राहु नये यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानामधुन गरीबांना ५ किलो तांदूळ मोफत देण्यास सांगितले. दि. २१ रोजी याच योजनेअंतर्गत तामलवाडी येथील बी.डी.जगताप व एस.एस.गायकवाड यांच्या स्वस्त धान्य दुकानामधुन मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मोफत धान्य घेण्यासाठी दोन्ही दुकानासमोर लांबच लांब रांग लागली होती. नागरीकानी धान्य घेण्यासाठी गर्दी न करता तोंडाला मास्क लावुन व सुरक्षित अंतर ठेवूनच धान्य घ्यावे असे आवाहन तलाठी विठ्ठल शिंदे यानी नागरीकांना केले.
    
 यावेळी तलाठी विठ्ठल  शिंदे,उपसरपंच दत्तात्रय वडणे,अविनाश गायकवाड, शिवदास पाटील,श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब जगताप, ज्ञानेश्वर माळी, भागवत पाटील, गोपाळ गायकवाड, सर्जेराव गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप आदी उपस्थित होते.
 
Top