नळदुर्ग : सुहास येडगे  

कोरोनाचे संकट सध्या संपुर्ण जगासमोर उभे टाकले आहे. कोरोनाच्या संकटापुढे आज जग हतबल झाले आहे. आपला देशही कोरोनाशी मुकाबला करीत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी नळदुर्ग येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. सदरील मदतीचा धनादेश दि.२१ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांच्याकडे समितीने सुपूर्द केला.

सध्या कोरोनाचा राज्यात मोठ्याप्रमाणात फैलाव होऊ नये यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांतील नागरीकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्याच्या अश्वासनाला प्रतीसाद देत राज्यांतील अनेक दानशुर व्यक्ती, उद्योगपती, हिंदी मराठी सिनेकलावंत,सामाजिक संस्था, देवस्थान आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करीत आहेत. कोरोनाच्या लढयात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणुन नळदुर्ग येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ हजार रुपयांची मदत दिली आहे. दि.२१ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांच्याकडे सदरील रकमेचा धनादेश समितीने सुपूर्द केला. समितीचे सदस्य पद्माकर घोडके यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. 

यावेळी समितीचे सदस्य पत्रकार विलास येडगे, समितीचे कोषाध्यक्ष अमर भाळे,सल्लागार प्रभाकर घोडके आदीजन उपस्थित होते. यावेळी सपोनि वानखेडे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या या निर्णयाचे कौतुक केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समिती नळदुर्ग शहरात नेहमीच सामाजिक तसेच राष्ट्रीय कार्यात सहभागी असते. शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमातही समितीने हिरीरीने भाग घेऊन नळदुर्ग येथे वृक्षारोपण करून जवळपास वीस वृक्षांचे जतन करून त्यांची जोपासना केली आहे. तसेच नवरात्रामध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्याचे कामही समिती दरवर्षी करते. 

कोरोनाच्या लढ्यातही आपला खारीचा वाटा असावा म्हणुन समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. समितीचे दयानंद चौरे, ज्ञानेश्वर घोडके, सुहास येडगे, पद्माकर घोडके, प्रभाकर घोडके, अमर भाळे,विलास येडगे यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Top