होर्टी, दि.22 : लॉकडाऊनच्या काळात त्यांचे काम धंदे पूर्णपणे बंद झाले आहेत. कामधंदे बंद असल्यामुळे या गोरगरीब कुटुंबातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.परीणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या गरजू लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील सौर ऊर्जा कंपनी च्या वतीने होर्टी येथिल 80 गरजू लोकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले . त्यामध्ये तांदूळ, गहू, साखर ,चहापत्ती, मीठ ,मसूरडाळ, हळद, जिरे ,साबण, इत्यादी जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे.
यावेळी सौर ऊर्जा कंपनीतर्फे हलदरा तांडा, वडाचा तांडा, व होर्टी येथील 120 गोरगरिबांना व विधवा महिलांना या मोफत किराणा किटचे वाटप सकाळी 9:30 वा. ग्रामपंचायत समोर करण्यात आले.
यावेळी सोलार कंपनीचे मँनेजर तुषार तिवारी, इंनचार्ज राजकुमार, एस के डेव्हलपर्सचे इंनचार्ज जाकिर पटेल, सुपरवायझर वैजिनाथ कोळी, प्रेमदास राठोड तसेच गावातील होर्टीचे उपसरपंच आशोक राजमाने, सदस्य संजय गुंजीटे, माजी उपसरपंच माहंतेश पाटील ,बालाजी साखरे व ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या हस्ते या किट चे वाटप करण्यात आले.