तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोरोनो या एका छोट्या विषाणुने जगभरात हाहाकार माजवला असुन हा विषाणू आता आपल्या खेडेगावामध्ये आपले हात पाय पसरू लागल्याने गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,कर्अमचारी,धिकारी,आरोग्य विभाग,पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते यानी हेवे दावे विसरून चला आपण सारे एक होऊया,कोरोनाला रोखुया असे म्हटले तर आपले गाव नक्कीच कोरोनापासुन दुर राहण्यास मदत होईल.
कोविड - १९ या विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन या विषाणुने संपुर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. जगातील अनेक देशातील लाखो नागरीकांना कोरोनाची लागण होत असुन हजारो नागरीक दररोज आपले जीव गमावताना दिसत आहेत.आपल्या देशातही कोरोना रूग्णांची संख्या लाखाच्या जवळपास पोहचली असुन शेकडो नागरीकांचे बळी जात आहेत.हीच परिस्थिती राज्यातील नाशिक,मुंबई,पुणे,सोलापूर अशा विविध शहरामध्ये दिसुन येत आहे.प्रशासन रात्रंदिवस जिवाचे बाजी लावत नागरीकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करतच आहे.या महामारीतुन आपला जीव वाचवण्यासाठी वरील हाॅटस्पाॅट शहरांमधुन हजारो नागरीकांनी आपापल्या गावचा रस्ता धरला आहे.गावी आल्यानंतर काहीजण स्वतःहुन क्वारंटाईन होत आहेत परंतु काहीजण रात्रीतुन गपचिप येऊन घरात थांबत आहेत.अशा व्यक्तींनी घरात न थांबता आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करायला हवी.तो स्वतः जात नसल्यास गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले कर्तव्य समजुन अशा लोकांची नावे प्रशासनास कळवावी.माझ्या ओळखीचा,माझा पाहुणा,माझा मित्र,माझे मतदार ,मी का कुणासंग वाकडे घेऊ?,येऊ दे आपल्याला काय करायचंय असे समजुन बसाल तर एखादा कोरोनाचा रूग्ण संपुर्ण गावाला लागण करेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोष्ट ही पोलीस,आरोग्य विभाग यांनीच करावी हे मनातुन काढुन टाका अन् गावामध्ये बाहेरगावहुन व्यक्ती आल्यास नाती,दोस्ती बाजुला ठेवून प्रशासनाला कळवा,आपल्या गल्लीत अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याची चौकशी करून प्रशासनास माहीती द्या,यासाठी गावातील सरपंच,सर्व सदस्य,तलाठी,ग्रामसेवक, पोलिस,आरोग्य अधिकारी,सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी हेवे दावे विसरून एकत्रित येऊन या जिवघेण्या विषाणूच्या विरोधात लढा द्यायला हवा तर आणी तरच आपण या विषाणुला गावामध्ये येण्यास प्रतिबंध करू शकतो अन्यथा कोरोनाची लागण अटळ आहे आणि कोरोना झाल्यावर काय होतय आपण बघतच आहोत. आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचय,माणसांशी नाही.म्हणून आपल्या कुटुंबासाठी,आपल्या गावासाठी,तालुका,जिल्हा अन् देशासाठी आपण सारे एक होवुया....,चला कोरोनाला रोखुया.
