तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या नगरीत दि.३१ में रविवार रोजी पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती चे औच्युत साधुन तुळजापूर शहरातील क्वारनटाईन नागरीकांना पुलाव राईस वाटप करण्यात आले.
युवा नेते विनोद पिटु गंगणे व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर शहरातील क्वारन टाईन नागरीकांना पुलाव राईस चे अल्पोपहार जेवण वाटप करण्यात आले. यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घाटशिळ रोड 108 भक्त निवास व उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी नागरीकांना वाटप करण्यात आले. या दरम्यान क्वारनटाईन नागरीकांच्या सोई सुविधांची ही नगराध्यक्षांकडुन पाहणी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, नगरसेवक नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, रत्नदिप भोसले, श्रीनाथ काका शिंदे, हणमंत पुजारी,व सहकारी उपस्थित होते.
