तुळजापूर, दि. १० : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसे नेते अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण,दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा मनसेच्या जिल्हासंघटक पदी तुळजापूरचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर यांची निवड करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष असून तिघांना एकत्र आणून पक्षाचे संघटन मजबूत करणार असून १९९० पासून राजसाहेबांच्या विचाराने एकनिष्ठेने पक्षाचे कार्य केल्यामुळेच मला आजपर्यंत जिल्हासचिव,जिल्हाध्यक्ष, मनसेचे शॅडो कॅबीनेट मध्ये कृषी व दुग्धविकास या खात्याची जबाबदारी देवून आता संपुर्ण जिल्ह्यासाठी पक्ष योग्यरितीने उभा करण्यासाठी जिल्हासंघटक या पदावरती निवड केल्याचे सांगून लवकरच जिल्ह्यात मनसे विरोधीपक्षाची भूमिकेतून लोकअंदोलन उभे करून पुर्वीप्रमाणेच पक्ष उभा करून दाखवू असे मत नुतन जिल्हासंघटक अमरराजे कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, राजेंद्र गपाट, प्रशांत नवगिरे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, राजेंद्र कोरेकर,हेमंत पाठक,बबन वाघमारे, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, प्रमोद कदम,सुरज कोठावळे,पवन वर्पे,राजू चुंगे,अक्षय साळवे,संजय पवार, अॅड.अमोल वरूडकर,उमेश कांबळे,झुंबर काळदाते,अविनाश पवार,विशाल माने,लक्ष्मण सलगर,अमोल शिंदे यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


 
Top