तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील भवानी रोड वरील चँनल गेट जवळील असलेल्या दोन दुकानास शॉर्टसर्किट मुळे आग लागुन दोन दुकानातील सामान जळुन खाक झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी घडली.
या बाबत सविस्तर वृत असे की तुळजापुर येथील भवानी रोड वरील न.प.चे चँनल गेट जवळ असलेल्या बालाजी मारुती गायकवाड रा.तुळजापुर यांचे श्री स्वामी सयर्थ कँसेट दुकान व शुभम शञगुन राऊत रा.तुळजापुर यांचे जनरल स्टोअर्स खेळणी व श्री देवीचे माळपरडी सामान हे दोन्ही दुकान जवळ जवळ चिटकून असलेल्या पञ्याच्या दोन दुकानास दि.२१ गुरुवार रोजी दुपारी ३/३० सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन दुकानातील सामान जळुन खाक झाले.
यामध्ये बालाजी गायकवाड यांच्या दुकानातील सामान २ लँपटाँप १ काँप्युटर,,१ टि.व्ही १ फ्रिज,व
कँसेट हाऊस,मेमरी कार्ड साहित्य कोल्ड्रींग साहित्य आदीसह वस्तु जागीच जळुन खाक झाले व त्याच बाजुला असलेल्या शुभम राऊत यांच्या दुकानात श्री तुळजा भवानी स्टेशनरी खेळणी व जनरल स्टोअर्स साहित्य श्री देवीच्या माळ परडीचे आदीसह इतर वस्तु जळुन खाक झाले.या साँटसर्किट मुळे लागलेल्या आगीत बालाजी गायकवाड यांच्या दुकानातील सामानाचे सुमारे दोन ते अडिच लाखाचे नुकसान झाले तर शुभम राऊत यांच्या दुकानातील सामान एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.
अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगित दोन्ही दुकानाचे मोठे नुकसान झाले. या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीस दुकानातील सामानामुळे मोठा पेट घेतला ही आग विझविण्यासाठी तेथील स्थानिक नागरीकांनी मोठा प्रयत्न केला त्यानंतर ही आग विझविण्यासाठी तुळजापुर न.प.ची अग्नीशामक दलाची गाडी आली आणि विझविण्यात यश आले विशेष म्हणजे दुकाना माघे म.रा.वि.मंडळाची डि.पी.आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आले नव्हते.


