काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद (दादा) डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मंगळवार दि. (26) रोजी कै. मिलिंद बाप्पा डोंगरे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 1000 सॅनिटायझर आणि आम्ही मंगरुळकर नाव असलेल्या मास्कचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावात निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी करण्यात आली.
यापूर्वी सुद्धा त्यांनी नात चिरंजीव युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मकरंद डोंगरे यांची मुलगी मनस्विनी हिच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त कै.मिलिंद (बप्पा )डोंगरे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावातील अनाथ,निराधार,वंचित गोरगरीबांना मंगळवार दि.21 एप्रिल रोजी अन्नधान्याचे वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. या त्यांच्या उपक्रमाबद्दल मंगरुळसह परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला असून अशा गंभीर परिस्थितीत अनेक सर्व सामान्य गरीब निराधार महिला कुटुंबांचा रोजगार बुडाला असल्याने त्यांच्यापुढे उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण समाजाचे काही तरी देणे आहोत या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी किराणा साहित्य, मास्क व सॅनिटायझरसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी राजकारणाला बगल देत मास्कवरील *आम्ही मंगरुळकर* हे नाव सर्वांचे आकर्षण ठरले. मंगरुळ येथील डोंगरे परिवाराकडून विविध सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून निराधार व गोरगरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद हा आत्मिक समाधान देत असल्याची भावना मुकूंद डोंगरे यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व स्तरातील लोक उपस्थित होते.


