तुळजापूर, दि. २३ :

राहुल शहाजी बोबडे रा. पापनास नगर, तुळजापूर यांनी दि. 23.05.2020 रोजी 12.00 वा. पापनास नगर, तुळजापूर येथे आपल्या विवेकानंद कोचींग क्लासेस मध्ये विद्यार्थी एकत्र जमवून गर्दी निर्माण केली. अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाची अवज्ञा करुन निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन पो.ठा. तुळजापूर येथील सपोनि- श्री. गणपत राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन राहुल बोबडे यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
 
Top