उस्मानाबाद, दि. २५ : लॉकडाऊन काळात दि. 24.05.2020 रोजी 11.00 वा. सु. उस्मानाबाद येथील डी.एड. कॉलेजच्या जवळ असलेल्या स्मशानभुमीत मच्छिंद्र कारकुन काळे रा. साठेनगर, उस्मानाबाद यांच्या अंत्यविधीसाठी 250 ते 300 व्यक्तींनी एकत्र जमून गर्दी केली. अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी कोरोना कोविड- 19 संसर्ग रोखन्यासाठी जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली. यावरुन संबंधीत सर्व व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 34 अन्वये गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.
