तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर माती,काटेरी झुडपे टाकुन सिमा बंद करण्यात आल्या असतानाही ते बाजुला करून जिल्हाबंदीचे आदेश पायदळी तुडवत अनेक नागरीक वडगाव काटी गावात मुक्त संचार करत आहेत याकडे,ग्रामपंचायत,पोलिस प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे राष्ट्रीय छावा जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी बोलताना सांगितले आहे.
सोलापूर जिल्हासह शहरामध्ये कोवीड - १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिमेवरील गावानी सतर्क रहाण्याची आवश्यकता असतानाही सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेले तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी गावात नागरीक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.रेड झोन जिल्ह्यातील नागरीकांनी गावामध्ये येऊ नये यासाठी गावच्या सिमा काटेरी झुडपे,माती टाकुन बंद करण्यात आल्या असतानाही काही महाशय काटेरी झुडपे काढुन गावामध्ये ये जा करत आहेत.अडवण्याचा प्रयत्न केला असता तक्रारी करत आहेत, गावामध्ये अजुनही अवैद्य दारूविक्री सुरूच असुन दारू पिण्यासाठी तळीराम प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवुन एकच गर्दी करत आहेत.याकडे ग्रामपंचायत ,पोलिस प्रशासन मात्र अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे छावा जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी बोलताना सांगितले आहे.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचे तीन तेरा वाजले असुन काहीजण विनामास्क रस्त्यावर,चौकाचौकात एकत्र येत आहेत.कोरोनाच्या भीतीने मुंबई,पुणे या ठिकाणाहुन शेकडो नागरीक गावामध्ये आले असुन अनेकांनी आपली तपासणी केलेली नाही तर काहीजणांना विलगीकरण केलेले असतानाही ते गावामध्ये मुक्तपणे संचार करीत आहेत याकडे कोणीच लक्ष देत नाहीत.अशीच परिस्थिती राहील्यास कोरोनाचा संसर्ग लहान गावानाही आपल्या विळख्यात नक्कीच घेणार. याकडे जिल्हाप्रशासनाने लक्ष घालुन गावप्रशासनाला जागृत करावे अशी मागणीही राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वजित चुंगे यानी तरूण भारतशी बोलताना केली आहे.
ग्रामसुरक्षा दलाची ओळखपत्रे केली परत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये तामलवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्रामसुरक्षा दलाची नेमणुक करण्यात आली होती.परंतु कोरोना विरुद्ध काम करत असताना काही राजकीय मंडळी स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत असल्याने व प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामसुरक्षा दल सोडुन पोलीस प्रशासनाने दिलेली ओळखपत्रे लेखी पत्र देऊन परत केली असल्याचे विश्वजित चुंगे यानी सांगितले.
गावात दुसर्यांदा जंतुनाशक औषधाची फवारणी
कोविड- १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये जंतुनाशक फवारणी औषध असतानाही फवारणी केली जात नसल्याने ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराबाबत जिल्हाधिकारी याना सांगितले त्यावेळी वरीष्ठांच्या आदेशानुसार दि. २७ रोजी गावामध्ये दुसर्यावेळी जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत असल्याचेही विश्वजित चुंगे यानी सांगितले आहे.
