तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानामधुन गावातील जनतेला शिधापत्रिकेनुसार धान्य मिळत नाही,धान्य घेतल्यास पावती मिळत नाही,कुणाचे शिधापत्रिकाच गायब,काही लोकांची शिधापत्रिकवरून नावेच गायब,तर काही नागरीकाना मारहाणही करण्यात आली असल्याने येथील स्वस्त धान्य दुकानदार विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत,धन्यकुमार डांगे,शंकर कदम यांच्याशी बोलताना नागरीकांनी अक्षरशः तक्रारीचा पाऊसच पाडला व प्रशासनाने या स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी करत दि.२२ रोजी ग्रामस्थ व शिवाजी सावंत यानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी तक्रार करून संबधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गोर गरीब,कष्टकरी,विधवा,भुमीहीन असे नागरीकावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने गावागावामध्ये स्वस्त धान्य दुकानाची निर्मीती करून गरीब,कष्टकरी जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले.सध्या कोरोना या विषाणुने संपुर्ण देशासह राज्याला वेढा घातला असुन जनतेच्या हितासाठी लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला.परंतु या लाॅकडाऊनच्या काळात जनतेची उपासमार होऊ नये यासाठी याच स्वस्त धान्य दुकानामधुन तीन महिन्यासाठी प्रत्येक महीन्याला मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. परंतु पिंपळा खुर्द ता. तुळजापुर येथील स्वस्त धान्य दुकान चालक पुर्वीपासुनच धान्य वाटपात भ्रष्टाचार करून मनमानी करतअसल्याचे तेथील नागरीकांनी या दुकानदार विरोधात दि.२१ रोजी माजी सरपंच धन्यकुमार डांगे,शंकर कदम,भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांच्याशी बोलताना येथील नागरीकांनी तक्रारीचा अक्षरशः पाऊसच पाडला.
गावामध्ये जवळपास ४७० वेगवेगळे शिधापत्रिकाधारक असुन प्रत्येकाला शिधापत्रिकेनुसार धान्य मिळत नाही,अनेक लोकांच्या शिधापत्रिका दुकानदाराकडेच ठेवल्याने त्यानाही धान्य नाही,काही लोकांची पुर्वी नावे असतानाही आतामात्र शिधापत्रिकेतुन नावेच गायब झाली आहेत,प्रत्येक शिधापत्रिकेतील दोन ते तीन व्यक्तींचे धान्य दिले जात नाही,हातावर पोट असणार्या काही लोकांना या लाॅकडाऊन काळातही धान्य नाही,धान्य घेतल्यास एकदाही पावती मिळत नाही,तसेच शिधापत्रिका नसलेल्या काही नागरीकांकडुन नविन शिधापत्रिका देतो म्हणून हजारो रूपये घेतल्याचेही नागरीकांनी बोलताना सांगितले. याबाबत गावातीलच काही गरीब नागरीकांनी त्यास विचारले असता तुम्हाला काय करायचय ते करा असे म्हणत काही नागरीकांना धमकावत, मारहाण केल्याची धक्कादायक माहीतीही ग्रामस्थांनी दिली आहे.
अशा अनेक तक्रारी येथील स्वस्त धान्य दुकानदार विरोधात आल्याने पिंपळा खुर्द येथील शंभर ते सव्वाशे महीला ,पुरूषांनी सह्याची मोहीम राबवत या स्वस्त धान्य दुकानाचा परवानाच रद्द करावा अशी मागणीही बोलताना व्यक्त केली आहे.गोरगरिबांच्या धान्यावर गेली अनेक वर्षापासून डल्ला मारून भ्रष्टाचार करणार्या या स्वस्त धान्य दुकानदारावर कडक कारवाई करून संबधित दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थ व भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ, पालकमंत्री जिल्हाधिकारी,तहसीलदार,यांच्याकडे लेखी तक्रार मेलद्वारे केली आहे.संबधित दुकानदारावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशाराही देण्यात आला आहे.या लाॅकडाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानामधुन धान्याचा भ्रष्टाचार करून सामान्य जनतेच्या तोंडातुन घास हिराऊन घेणार्या या दुकानदारावर काय कारवाई होणार? याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.