तुळजापुर : कुमार नाईकवाडी
कोरोना च्या संकटात सापडलेल्या नागरीकांची खाजगी फायनान्स, वितीय संस्था बचत गट व इतर मायक्रो फायनान्स यांच्या मार्फत होणाऱ्या सक्तीची वसुली त्वरीत थांबवावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने दि.१२ शुक्रवार रोजी तुळजापुर तहसीलदार यांच्या कडे देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील अडीच माहिन्यापासुन सर्व व्यवसाय व्यवहार व रोजगार ठप्प झाले आहेत त्यामुळे शाषना ने बँका तसेच खाजगी फायनान्स ना पुढील तीन माहिने हप्ते न घेण्याच्या सुचना केल्या आहेत परंतु मायक्रो फायनान्स वाले या सुचनाचे उल्लंघन करुन कोरोना च्या संकटात सापडलेल्या नागरीकांना खाजगी फायनान्स वितीय संस्था बचत गट व इतर मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जाच्या मागणीसाठी गोर गरीबांना दमदाटी करत आहेत बचत गटाच्या माहिलांना व सर्व सामान्य जनतेस सतत फोन व एस एम एसच्या माध्यमातून दंड आकारनी केली जाईल तसेच अनेकदा घरी येवुन पैसे देण्यासाठी तगादा लावत आहेत पैसे नाही भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत आहेत तरी या बाबत मा.तहसीलदार यांनी चौकशी करुन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी या निवेदनावर रा.काँ चे गोकुळ शिंदे धैर्यशील पाटील धनंजय पाटील अमर चोपदार शरद जगदाळे संदीप गंगणे सचिन कदम दुर्गेश सांळुके गणेश नन्नवरे आप्पा पवार नितीन रोचकरी शशीकांत नवले संकेत सांळुके प्रशांत अपराध ओकांर चोपदार आदीसह रा.काँ.कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.
