इटकळ, दि.०८ :

मोटारसायकल व मालट्रकच्या धडकेत मोटारसायकल वरील युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात इटकळ अक्कलकोट रस्त्यावर इटकळ जवळ ७ जून रोजी दुपारी  साडेबाराच्या दरम्यान घडला.यामध्ये मेहबूब शम्मशोदिन नदाफ वय ४२रा.केसरजवळगा हे गंभीर जखमी झाल्याने तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार  सुरू आसताना मृत्यू झाला. 

केशेगाव ता.तुळजापूरला येथे मुलीला भेटण्यासाठी आले होते.इटकळ जवळ  त्याची  मोटारसायकल एम एच २५एम३८१६ व एम एच ४२बी ९३४४या मालट्रक यांच्या  अपघात होऊन मोटारसायकल वरील मेहबूब मशोदिन नदाफ हे गंभीर जखमी झाले.त्याना उपचारासाठी खाजगी वाहनाने तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू आसताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत इटकळ पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर दोन्ही वाहनाने चौकीत आण्यात आली. 
 
Top