उमरगा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उमरगा नगरपालीका हद्दीत दि. 06.07.2020 ते 10.07.2020 या काळात मनाई आदेश अंमलात आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 06.07.2020 रोजी प्रविण भारत गायकवाड यांनी ‘प्रभात फोटो स्टुडीओ’ हा 11.16 वा. व्यवसायास चालू ठेवल्याचे तर गोपाळ मारुती मडोळे यांनी ‘लाँड्री दुकान’ 11.45 वा. व्यवसायास चालू ठेवल्याचे उमरगा पो.ठा. यांच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 06.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.