जळकोट, दि.२२ : मेघराज किलजे
समाज भूषण व राज्य शासनाचा दलितमित्र पुरस्कार प्राप्त कै.मोतीराम नंदू चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आलियाबाद व जळकोट (ता.तुळजापुर) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सेवानिवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण, माजी कालवा निरीक्षक अमृता चव्हाण, गोविंद चुंगे ,शिवाजी नाईक, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक नेमिनाथ चव्हाण ,मंडळ निरीक्षक नामदेव नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी बी.आर.पवार,ग्रा.प.सदस्य जितू कदम, मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण,अमोल चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण,थावरू राठोड, शंकर राठोड, पांडुरंग चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड, सर्व शिक्षक वर्ग ,ग्रामस्थ उपस्थित होते.