नळदुर्ग, दि. ३० :
नळदुर्ग येथील पशुपालक प्रविण प्रभाकर सुरवसे यांनी आपल्या देवनी गायीचे नर वासराच्या प्रेमापोटी उपचार कण्यासाठी चक्क सातारा गाठून राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ रेठरे बुद्रुक जि.सातरा येथे घेऊन गेले. त्या वासराला जन्मजात दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकलेले किंवा चिकटलेले होते. याला सायंटिफिक भाषेमध्ये Bilateral flexore tendon असे म्हणतात अशी माहिती डाँक्टर विनोद पाटील यांनी दिली. हे वासरू अवघ्या एक महिन्याचे होते युट्युब वरील डॉक्टर सचिन वंजारी यांच्या ऑपरेशनचा व्हिडीओ पाहून व डॉक्टर विनोद पाटील यांच्या सांगण्यावरून सुरवसे हे नळदुर्ग येथून रेठरे बुद्रुक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑपरेशन करण्यासाठी गेले होते.
प्रविण सुरवसे यांचे त्या वासरा वरती एवढे प्रेम होते की जेव्हा आम्ही त्यांना विचारले की तुम्ही एवढ्या दूर कसे काय घेऊन आला तर त्यांनी असे सांगितले की मी माझ्या मुलावर मी जेवढे प्रेम करतो तेवढेच या वासरा वरती करतो, व हे त्यांचे वाक्य ऐकून आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती उपचार करणाऱ्या डाँक्टर वंजारी यांनी दिली व पुढे सांगीतले की , २२ जुलै रोजी ऑपरेशन चालू केले या ऑपरेशनला सकाळी दहा वाजता सुरुवात केली होती व ते तीन वाजता पूर्ण झाले हे ऑपरेशन डाँ. सचिन वंजारी, पशुधन विकास अधिकारी रेठरे बुद्रुक व डॉ. विनोद पाटील पशुधन विकास अधिकारी औंढ तसेच दत्ता देसाई, हनुमंत जाधव व इतर सहकारी यांच्या टीमने पाच तास अथक प्रयत्न करून पूर्ण केले ऑपरेशन करत असताना या लहान वासरा वरती डॉक्टरांनी एका पायावर तीन ऑपरेशन करावे लागले पहिले म्हणजे जन्मजात वाकडे असलेले पाय सरळ करणे हे ऑपरेशन करत असताना जे आखूड असणारे muscles and tendon ला झेड कट घेऊन लांब करण्यात आले व जोडण्यात आले त्याचबरोबर दुसरी शस्त्रक्रिया म्हणजे सरळ झालेला जो पाय होता त्या ठिकाणी आणि तिथे कातडी कमी पडत होती ती कातडी दुसऱ्या जागेवरून कापून कमी पडलेल्या जागी बसवण्यात आली त्याला स्किन ग्राफ्टिंग असे म्हणतात तसं बघितलं तर ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि क्लिष्ट अशी आहे ही शस्त्रक्रिया माणसांमध्ये करून देखील यशस्वी होण्याचे प्रमाण खूप कमी आहे पण या वासराच्या प्रेमापोटी आणि ही शस्त्रक्रिया केली तसेच तिसरी शस्त्रक्रिया म्हणजे सरळ केलेला पाय काही दिवस तरी न हलता किंवा तसाच सरळ राहिला पाहिजे. त्याशिवाय या झालेल्या जखमा किंवा जोडलेले muscles and tendons जोडले जाणार नाहीत याकरिता स्टील राँड च्या साह्याने या वासरांमध्ये external fixation केले व ऑपरेशन झाल्यानंतर एक तासाने हे वासरू शुद्धीवर आले त्यानंतर त्या वासराने दूध पिले व आपल्या मालकाबरोबर नळदुर्ग या गावी रवाना झाले. आशी माहिती डाँक्टर वंजारी यांनी दिली.
