काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 16 रोजी सावरगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील काटीत रुग्ण आढळल्याने  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता तथा संपर्क अधिकारी अनंत कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना कोरोना विषाणूला घाबरून न जाण्याचे आवाहन करीत प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे सांगितले. यावेळी दुरदर आजारी असणा-या रुग्णाची माहिती घेण्याच्या व थर्मल स्क्रनिंग करण्याच्या ग्रामपंचायतला सुचना केल्या. यावर ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांनी बचत गटामार्फत (सीआरपीमार्फत) सर्वे केला असल्याचे सांगून दुरदर आजाराचे 205 रुग्ण असल्याचे सांगितले. यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबियांना कै.नागरबाई जालिंदर कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोगप्रतिकारक अर्सिनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांच्या हस्ते करण्यात आल्या.



   यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या विकासकामांची माहिती सरपंच आदेश कोळी व ग्रामसेवक सुरवसे यांनी  दिली. यावेळी करण्यात आलेल्या बंदिस्त गटारीतून सांडपाणी व्यवस्थापन कामाचे कौतुक करुन अशा प्रकारचे काम जिल्ह्यातील एकमेव काम असल्याचे सांगितले. सांडपाणी व्यवस्थापनासाठी व जलजीवन मिशन अंतर्गत  घरगुती नळजोडणीसाठी 1800 रुपये अनुदानसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना केल्या. 

      यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अनंत कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, रियाज शेख, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, भैरी काळे, अमरसिंह निंबाळकर, माजीद इनामदार, साजिद इनामदार, करीम बेग, हेरार काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top