नळदुर्ग, दि. 08 : मौजे धनगरवाडी, ता. तुळजापूर येथे गावातील शेतरस्ता व शिवरस्ता या कारणावरुन दोन गटांत वाद झाला होता. याची खबर पोलीस पाटील- विठ्ठल हनुमंत घोडके, रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांनी पोलीस ठाण्यास कळवली होती. याचा राग मनात धरुन गावकरी- अमोल बबन घोडके, बळीराम देवराव घोडके, गणेश दुधभाते, खंडु घोडके अशा चौघांनी दि. 06.07.2020 रोजी 21.30 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे विठ्ठल घोडके यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुरा विठ्ठल घोडके यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.