वागदरी : एस.के.गायकवाड

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून शासना कडून व समाजातील सर्वस्तरातून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता  काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मध्ये मी देव पहतोय.सध्या तरी कोरोनावर प्रतिबंध हाच उपाय आहे .तेंव्हा प्रत्येकानी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन थोर सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामाप्पा खजूरे यांनी वागदरी ता.तुळजापूर येथे बोलताना केले.

     सत्यशिल सामाजिक संस्था पुणे (वागदरी) ता.तुळजापूरच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामाप्पा खजूरे यांच्या हस्ते कोव्हीड-१९ " कोरोना जनसेवा पुरस्कार-२०२०" देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. खजुरे बोलत होते.
  
 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्दामान सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच नागनाथ बनसोडे व ग्र.प. सद्स्य रावसाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एस.के.गायकवाड यांनी केले.तर सन्मान पत्राचे वाचन युवा कार्यकर्ते शेखर बनसोडे यांनी केले.

    या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार,उपसरपंच दत्ता सुरवसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर, ग्रा.प. सदस्य महादेव बिराजदार, रावसाहेब वाघमारे, विद्या बिराजदार, कमलबाई धुमाळ, बकुलाबाई भोसले, मुक्ताबाई वाघमारे,सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, आशा कार्यकर्ती भारतबाई बिराजदार, अंगणवाडी कार्यकर्ती पदमीनबाई पवार, मदतनीस रूपाली जाधव ,पत्रकार दयानंद काळूंके,किशोर धुमाळ, एस.के गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग कचवा,ग्रा.प. कर्मचारी सर्जेराव चव्हाण, शालूबाई चव्हाण आदींना कोरोना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
Top