चिवरी, दि. 15 : देश रक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या चिवरी येथील आजी-माजी सैनिकाचे व मयत झालेल्या सैनिकांची पत्नीचांही सन्मान माजी सैनिक विठ्ठल मारुती होगाडे यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील आजी- माजी सैनिकांचा माजी सैनिक विठ्ठल मारुती होगाडे यांच्यावतीने स्वखर्चातुन सन्मान करण्यात आला .यावेळी पोलीस पाटील रुपेश बिराजदार, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचुवाई, सचिन बिराजदार, दिपक पाटील, किसन देशमुख, शंकर झिंगरे,प्रमोद साखरे, यशवंत झिंगरे, विश्वास बिराजदार ,बालाजी झिंगरे, बाळु देडे, प्रकाश राजमाने,बाबासाहेब लोहार, खंडु राजमाने आदिंनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
यावेळी माजी सैनिक विष्णू परीट, नागनाथ बनसोडे, हरिदास बिराजदार, अभिमन्यू चिमणे, सुधाकर वाघमारे, नारायण काळे, प्रभाकर भुजबळ, शेषराव बलसुरे, संभाजी काळदाते, विश्वनाथ काळजाते, भारत बिराजदार, जयपाल सिंग बायस, आधी माझी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.