जळकोट : मेघराज किलजे
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जळकोट येथील कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळेत चा नवा उपक्रम जळकोट कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढीत गुरुजींनी शाळास्तरावर नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे पण या ऑनलाइन शिक्षणाबरोबर कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा जळकोट या शाळेने ऑनलाइन शिक्षणाबरोबर व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तर शिक्षण चालूच आहे. परंतु ऑफलाईन शिक्षण म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा नव उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमामुळे ज्या विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नाही अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे आणि ऑनलाइन चे अभ्यासक्रम दिलेले आहे त्यांचेसुद्धा अडचणी काय आहे याची चौकशी करून निराकरण करण्यात येत आहे कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने सोशल डिस्टन्स सिंगचे पालन करून हे उपक्रम राबवत आहे ग्रामीण भागातील व वाड्या वस्त्यावर भारनियमन व इंटरनेट मुळे ज्ञानदा नात अडचणी येत असल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे व शिक्षकांमध्ये चार-पाच महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्यामुळे समाधान लाभले आहे व विद्यार्थ्यांना कोरोना विषयी माहिती व मास्क चा वापर करण्याविषयी माहिती सांगितली आहे या उपक्रमामुळे सर्व कौतुक होत आहे. याकामी बी.जी.हाके,के.ए.ढोले,डी. एम. पांढरे व बी.एस.मुखम ना शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.