नळदुर्ग : शिवसेनेच्या तुळजापुर तालुका उपप्रमुख पदी रोहित चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल नळदुर्ग येथे शनिवार दि. ८ रोजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

 माजी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्यावतीने नळदुर्ग शहरामध्ये रोहित चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहर संघटक दीपक घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, आपासिंगा मीडिया सेल विभाग प्रमुख एस के कारभारी, शमशुद्दीन शेख, खंडू  घोडके, रामेश्वर घोडके, गजानन हळदे, महेश घोडके, महादेव वाघमारे, विकास चंदिले, राहुल घोडके, दादा निकंबे, महादेव माने, गुलाब शिंदे, बुवा सोनवणे, शिवाजी देवकर आदिजण उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्ञानेश्‍वर घोडके म्हणाले की, तुळजापूर तालुक्यामध्ये युवकांना पदभार देऊन संधी देण्यात यावी, असे आवाहन करून आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, तुळजापूर तालुका प्रमुख सन्माननीय जगन्नाथ गवळी यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसेना वाढीसाठी एकनिष्ठ शिवसैनिकांना पदी नियुक्ती करून काम करण्याची संधी द्यावी, असे ज्ञानेश्‍वर घोडके यांनी उद्देशून म्हणाले. शिवसेना निष्ठेचे फळ रोहित चव्हाण यांना मिळाले आहे. शिवसेना पक्षाशी एक निष्ठा मनामनात असली पाहिजे, रोहित चव्हाण यांना पुढील कार्यासाठी भगव्या मय शुभेच्छा देऊन तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेना वाढीस प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

 
Top