उमरगा : लक्ष्मण पवार
उमरगा पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीत पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपराध करणारे व त्यांना पाठीशी घालणारे यांच्यावर तात्काळ रितसर कार्यवाही व्हावे याकरिता कार्यतत्पर आहेत.
यात कलम 56 नुसार दोन हद्दपारीचे प्रस्ताव, कलम 93 प्रमाणे - अवैध दारू विक्री करणारे वीस जनांचा प्रतिबंध करण्यासाठी प्रस्ताव, कलम 144 प्रमाणे - 15 प्रस्ताव, कलम 110 प्रमाणे - गुन्हेगार यांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी 5 प्रस्ताव, कलम 107 प्रमाणे - सण उत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जाब देणार 45 जनांकडून बंधपत्राचे प्रस्ताव तर कलम 149 प्रमाणे - अपराध घडू नये या करिता 60 जनांवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत.
यावर तात्काळ कार्यवाही झाल्यास पोलीस ठाणे हद्दित शांतता राहील हे मात्र नक्की.