नळदुर्ग, दि. 04 : बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बी.ए., बी.एससी., बीकॉम अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रथम वर्षासाठी रजिस्टर करण्यासाठी शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2020 आहे. तर द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2020 आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वेबसाईट www.bamuaoa.digitaluniversity.ac हे आहे. प्रथम वर्ष ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहे. आवश्यक कागदोपत्र जोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी घंटे जी.ए. (मो.नं. 9422464757), काळे एन.एस. (मो.नं. 9689904408) यांच्याशी संपर्क साधावे.