तुळजापूर, दि. २ :
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ नरसिंग जाधव यांचे वडील आणि देवसिंगा येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव कुंडलीक जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री अडीच वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार आलुरे गुरुजी, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर या मान्यवरांनी बाजीराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.