लोहारा, दि. 05 : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावास जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बुधवारी भेट देवून ग्रामस्थांना चर्चा केली. त्याचबरोबर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपयायोजना बद्दल आढावा घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.

लोहारा तालुक्यातील तोरंबा, सालेगाव, खेड, आदी गावास उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना भौतिक अंतर ठेवण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्वांनी नियमाचे पालन करावे, तसेच आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी लक्षणे दिसून येताच तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे,  माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे,  तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ जाधव, डॉ श्री. मनाळे,डॉ. श्री. बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक चौरे, सरपंच यशवंत गरड, नारायण गुरव यांच्यासह उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top