उस्मानाबाद, दि. 02 : कोविड- 19 साथीच्या प्रादुर्भावामुळे अनेक मनाई आदेश अंमलात असुन गरजेनुसार त्यात वेळोवेळी बदल केले जात आहेत. या मनाई आदेशांची जनतेस योग्य माहिती व्हावी, गैरसमज दुर व्हावेत. या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तैनातीस असणाऱ्या पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नियमीतपणे जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बाजारपेठा, प्रतिबंधीत क्षेत्रे, गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. यातुन जनतेस मनाई आदेशांची योग्य माहिती होत असुन अफवा टाळण्यास मदत होत आहे.

 
Top