तुळजापूर, दि. 12 : शहरातील प्रभाग क्रं. 4 मधील साळुंके गल्लीतील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांच्यावतीने प्रभागाच्या नगरसेविका सौ. अपर्णा नागेश नाईक यांना मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील साळुंके गल्लीमध्ये बारा महिने गटारी तुंबलेले असतात. गटारातील पाणी रोडवरती येत असल्याने त्या ठिकाणी कायम डुकरांचे वावर दिसून येतो. तसेच अधिकृत कचराकुंडी नसल्याने कचरा कुठेही पडलेला असतो. नालीतील घाण काढून रोडवरती टाकत जाते व ती घाण तशी पडून राहत असल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. तसेच मोकाट जनावरांचा या ठिकाणी वावर असल्या कारणाने येथील नागरीकांना विशेषत: वृध्द व लहान मुलांना त्रास होत आहे. तसेच संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदाही प्रभागाही नगरसेवक आले नसून कोणत्याही उपयायोजनमध्ये सहभाग न घेतल्याचे सांगून निवेदनात पुढे म्हटले आहे की, विविध नागरी समस्यांना रोज येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत असून तात्काळ याची दखल घेवून नागरी समस्या दूर करण्याची मागणी नागरीकांच्यावतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुहास साखरे, करण साळुंके, अजिंक्य साळुंके, मंगशे साळुंके, शेख रियाज, अरुण साळुंके, राहुल भालेकर, श्रीकृष्ण साळुंके, सारंग साळुंके, हरिष साळुंके, आकाश भालेकर, मयुर साळुंके, देवाशिष साळुंके, मनोज साखरे, समर्थ साळुंके, रणजित साळुंके, आप्पासाहेब बोधले, अनमोल साळुंके, ऋषीकेश साळुंके आदींच्या स्वाक्ष-या आहेत.