तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे दि. २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यु होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्युस राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदीसह कांही व्यापारी वर्गानी जनता कर्फ्युला तिव्र विरोध दर्शविला होता. माञ शहरातील सुजान नागरीकांनी "माझे कुंटुब माझी जवाबदारी या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी वर्गानी दि. २३ बुधवार रोजी पाहिल्या दिवशीच आपली दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला.
दरम्यान, तुळजापुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे आदीसह कर्मचारी यांनी जनता कर्फ्यु च्या पार्श्वभूमीवर फेर फटका मारला.
तुळजापूर शहरातील मंदीर परिसर, भवानी रोड, मेन रोड, शुक्रवार पेठ, कमानवेस, मंगळवार पेठ, बसस्थानक परिसर आदीसह शहरातील दुकानाच्या व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्युला उस्फुर्तपणे पाठींबा देत कडकडीत बंद ठेवण्यात आला. शहरातील रस्त्यावर मोठा सन्नाटा पसरला होता. अत्यावश्यक सेवाची औषधी दुकाने व दुध विक्रीस या जनता कर्फ्यु तुन वगळण्यात आले होते. बाकीचे आस्थापना भाजी विक्री किराणा दुकाने आदीसह बंद होती.
शहरातील एस बी.आय.बँक, महाराष्ट्र बँक, हैद्राबाद बँकानी जनता कर्फ्युला पाठीबां देत बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. माञ खासगी बँका चालु होत्या. तसेच एस.टी बस सुरु होती. बुधवारी पहिल्या दिवशी जनता कर्फ्युस मोठा प्रतिसाद दिल्याने तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी नागरीकांचे आभार मानले आहेत.


