नळदुर्ग, दि. 27 : घरातुन टेलरकडे कपडे आणण्यास जाते असे सांगून घराबाहेर पडलेली 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी परतली नसल्याने तिचा अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची पोलीसात तक्रार सदरील मुलीच्या पित्याने दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नळदुर्ग शहरात राहणारी एक 16 वर्षीय मुलगी दि. 22.09.2020 रोजी 13.30 वा.  "टेलरकडे कपडे आणन्यास जाते" असे आई- वडीलांस सांगुन घराबाहेर पडली. परंतु ती घरी परतली नसल्याने कुटूंबीयांनी नातेवाईक- परिचीतांकडे तीचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन कोणीतरी व्यक्तीने तीचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा दि. 26.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 
Top