मुरूम, दि. 24 :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवादिन बुधवारी (ता.२४) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. 

यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ.महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.रवि आळंगे, डॉ.संध्या डांगे, डॉ.शिला स्वामी, डॉ.विलास खडके, डॉ, जयश्री सोमवंशी आदिंनीची उपस्थिती होती. फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून प्रा.मुकूंद धुळेकर, प्रा.अंकुश टाकळे, प्रा.डॉ.राजकुमार देवशेट्टे, शिवपुत्र सोलापूरे, भालचंद्र टाचले आदिंनी पुढाकार घेतला. 

 
Top