तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शहरात संसर्गजन्य कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने दि.२३ ते ३० या कालावधीत आठ दिवसाचा जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माञ दि.२३ ते २८ या जनता कर्फ्यु काळात संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव कमी झाल्याने तसेच शहरातील व्यापारी वर्गाचे व नागरीकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने मंगळवार दि.२९ रोजी पासुन शहरातील जनता कर्फ्यु शिथील करण्यात येत आहे. शहरातील सर्व दुकाने ९ ते ५ या वेळेत चालु राहतील, असा निर्णय नगरपरिषद च्या वतीने घेण्यात आला आहे.
तुळजापुर नगर परिषदेच्या वतीने दि. २८ सोमवार रोजी नगरपरिषदेच्या आवारात सामाजिक अंतर पाळुन जनता कर्फ्यु बाबत शहरातील व्यापारी व नागरीकांची बैठक बोलावुन पञकार परिषद घेण्यात आली. या पञकार परिषदेत तुळजापुर न.प.मुख्याधिकारी आशिष लोकरे व नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी बोलताना म्हणाले की, मंगळवार पासुन शहरातील जनता कर्फ्यु शिथील करण्यात येत आहे. तुळजापुर नगर परिषदेच्या वतीने यापुढे शहरात" नो मास्क, नो एन्ट्री" ही मोहीम राबविण्यात येणार आहे. संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे या पुढे शहरातील नागरीकांना तोडांला मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे. शहरात नागरीकांनी बाजारपेठात वावरताना सामाजिक अंतर पाळावे, प्रत्येक नागरीकांनी आपआपली जवाबदारी चे पालन करावे, काटेकोर पणे पालन केले तरच आपण कोरोनावर मात करु शकाल. शहराच्या भल्यासाठीच प्रत्येक नागरीकांनी आपले कर्तव्य बजावे. जनतेने आपले सरक्षण आपणच करावे. शहरात जनता कर्फ्यु केल्याने याचा शहरास फायदा झाला आहे. शहरातील व्यापारी वर्गाला व नागरीकांना अन्याय व ञास देणे हा आमंचा हेतु नाही, अशी खंत ही व्यक्त करण्यात आली. यापुढे शहरातील व्यापारी वर्गाला व नागरीकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल. शहरात वाढता संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचा पादुर्भाव व नवराञ महोत्सव तोडांवर येत असल्यामुळे मागील जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला होता. आपल्या शहरासाठी मुख्याधिकारी नगराध्यक्ष, नगरसेवक न.प.कर्मचारी अहोराञ परिश्रम घेत आहेत त्यामुळे शहर वाशियांनी न.प. प्रशासन बाबतीत द्वेष ठेवु नये अशा भावनाही व्यक्त केल्या. यापुढे शहरात मास्क लावण्याचे गरजेचे आहे.
सदरील बैठकी दरम्यान शहरातील व्यापारी वर्गानी टाहो फोडला सतत लाँकडाऊन, सतत जनता कर्फ्यु याला आम्ही फार वैतागलो आहोत, गेल्या सहा महिन्यापासुन आमच्या कुंटुबांची उपासमार होत आहे. आम्हांला कोण वाली आहे का नाही? मंदीर बंद असल्यामुळे आमच्या कुंटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील व्यापारी बांधवा सोबत तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दुरध्वनी द्वारे संवाद साधला व व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आगामी शारदीय नवराञ महोत्सवा दरम्यान राज्य शासन जो निर्णय देईल आम्हांला घ्यावा लागणार, असे यावेळी सांगण्यात आले.
सदरील बैठकीस न.प. अधिक्षक वैभव पाठक, नगरसेवक पंडितराव जगदाळे, रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, विशाल रोचकरी, विनोद गंगणे, नानासाहेब लोंढे, माऊली भोसले, राहुल खपले, विनोद पलंगे आदीसह नगरसेवक, शहरातील व्यापारी, नागरीक, न.प.कर्मचारी उपस्थित होते.

