जळकोट : मेघराज किलजे

एसबीआय फाउंडेशन, मुंबई व औरंगाबाद येथील दिलासा प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा व जखनी तांडा येथे ग्रामसेवा कार्यक्रम चालू आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळावे या हेतूने जळकोट आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य केंद्राला ३ सिलिंग फॅन भेट देण्यात आले.

यावेळी दिलासाचे प्रकल्प समन्वयक विलास राठोड, जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते,डॉ. गायकवाड, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, श्रीमंत राठोड, ज्ञानदेव लोखंडे, सुरज अंगुले, बालाजी पालमपल्ले, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top