तुळजापूर, दि. 27 : कुमार नाईकवाडी
तुळजापुर शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना वाढत्या रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी, नागरीकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्या साठी नगरसेवक रोचकरी यांनी प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना वाफ घेण्याची मशीन तसेच रोग प्रतिकारक गोळ्या अर्सेनिक अल्बम चे वाटप केले.
यावेळी सुहास गायकवाड, संतोष व्यवहारे, वैभव वडगावकर, राहुल भालेकर, करण साळुंके, सचिन सुरवसे, सुमित महिंद्रकर, पुरंजन कोंडो, रोहित देशपांडे आदींची उपस्थिती होती.
काँग्रेस नेते नगरसेवक सुनील(पिंटु) रोचकरी यांनी प्रभाग ४ मधील नागरिकांना कोरोना साथीच्या अनुषंगाने घराच्या परिसरातील स्वच्छता ठेवून तसेच बाहेर पडल्यानंतर मास्क वापरण्यास या सूचना केल्या शक्यतो गर्दीमध्ये जाऊ नका कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा महत्त्वाच्या सूचना दिल्यानंतर नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तसेच शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी गाफील राहू नये प्रत्येक माणसाने स्वतःची काळजी केल्यास शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मोठी मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात त्यांनी केले आहे.
