उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा शहर व परिसरात शांतता व सलोखा रहावा याकरिता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोरे, पोउपनि मालुसरे, वाघ ह्या सर्वांनी  एकञीत येत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार दोन महिन्याच्या कालावधीत कोरोना रोगाच्या सुचनांचे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत चांगली कामगिरी केली आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, उमरगा पोलीसांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत तब्बल सहाशे जणांवर कार्यवाही करीत 1 लाख 29 हजार 300 रूपये दंड वसूल करीत 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अवैध पध्दतीने जुगार  खेळणा-यावर 17 गुन्हे दाखल करीत कार्यवाही केले आहेत. अवैध पध्दतीने दारू विक्री करणारेवर 13 गुन्हे दाखल केले तर वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणारे तब्बल 403 जणांवर कार्यवाही करीत त्यांच्याकडून 88 हजार 900 रूपये दंड वसूल करण्यात आले आहे. घरफोडीचे गुन्हे करणारे टोळकं पकडून त्यांच्याकडून 1 लाख 26 हजार 250 रूपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेषतः कुन्हाळी परिसरात चोरीचे साहित्य लपवून ठेवल्याच्या गुप्त बातमीचा माग काढत छापा टाकून तब्बल 4 लाख रूपये किंमतीचे चोरीचे साहित्य आरोपीकडून जप्त करीत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उमरगा पोलीसांनी गणेशोत्सव व मोहरम या सणाच्या  काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकशे बेचाळीस जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच माडज येथे एक जण स्वतः च्या कब्जात एक तलवार बाळगलेला मिळून आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


 
Top