तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेले अनिल देविदास धोत्रे यांना अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सन 2020 चा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार गौरव जाहीर झाला आहे.
अनिल धोत्रे यांनी क्रीडा प्रशिक्षक म्हणून आपले कामगिरी सिद्ध करत आपले अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत चमकावले आहेत,क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांनी जाहीर केला आहे. अनिल धोत्रे यांना पुरस्कार जाहीर होताच सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
