होर्टी : बाळकृष्ण मुळे

शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती राज्य शाखेच्या वतीने शैक्षणिक, सामजिक, राष्ट्रीय कार्यात याच बरोबर कोविड- 19 महामारीच्या काळात  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जि. प.कन्या  प्रशाला मुरूम  ता उमरगा येथील उपक्रमशील शिक्षक रूपचंद आणप्पा ख्याडे तसेच जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा बेळंब येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.तनुजा चंद्रकांत गाढवे- ख्याडे यांना  राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार ;  सन्मानपत्र देऊन  गौरव करण्यात आला.

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष काशिनाथ भालके ,  मराठवाडा सरचिटणीस शशिकांत डांगे,जिल्हा नेते प्रवीण ठाकूर,  योगगुरु नागनाथ बदोले  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीचा वाढता प्रभाव पाहून व प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत ख्याडे दांपत्याचा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार देऊन सन्मान करून शुभेच्छा  देण्यात आल्या.याबद्दल ख्याडे दांपत्याचे सर्व  स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top