मुंबई, दि. 17 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे हे सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी सोलापुर जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत. ‍

मुख्यमंत्री ना. ठाकरे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण,सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) ,सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा ,सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण,सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा.अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण...

 
Top