चिवरी : राजगुरु साखरे

सध्या जिल्हाभर आत सर्वत्र शेतशिवारात शेतकऱ्यानी सोयाबीनच्या काढणी मळणीला सुरुवात केली आहे. मात्र यंदा खरिपाच्या पिकावर रोगराई व पावसाच्या अतिवृष्टीमुळे उदीड ,मुग पाठोपाठ सोयाबीन मोठा फटका बसल्याने उत्पादनही निम्मे याच्यावर घटले आहे. 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी व परिसरात सध्या शेतकरी सोयाबीनच्या राशी करण्यात व्यस्त आहेत. मात्र यंदा बहुतांशी शेतकऱ्यांची आर्थिक गणित कोलमडले आहे.पेरणी,खत,बि-बियाणेसाठी घेतलेले उसणेवारी पैसे कशी फेडायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सोयाबीन पीक सुरुवातीला चांगले दिसत असताना पिकाची फळधारणा काळातच हवामान व परतीच्या पावसाचा पिकाला फटका बसुन सोयाबीन चे एकरी उत्पादन ६० ते ७० घटले असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. 

एरवी एकरी  आठ ते दहा क्विंटल होणारे सोयाबीन उत्पादन यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे एकरी चार ते पाच क्विंटल वर आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे तसेच सोयाबीनची काढणी, मजुराची कापणी, पेरणी, बि- बियाणी  खत,मजुरी हा खर्च निघत नसल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात ही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी काहीच पडणार नाही. तसेच या वर्षी सोयाबीन काढणीच्या हंगामात पावसाचे वातावरण तयार झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत असून मिळालेल्या मजुराचे दरही वाढले आहेत. सोयाबीनच्या एका बॅगेला तीन हजार रुपये मजुरी घेत असल्याने हे दर  शेतकऱ्यांना न परवडणारे असल्याने शेतकरी सध्या हतबल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

 
Top