मुंबई : या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होवून शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. तर अनेकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी येत आहेत. 

शरद पवार हे दि. 18 व दि. 19 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर  तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबाद या ठिकाणी भेट देवून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

खा. शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा पुढीलप्रमाणे :-

दिनांक18-10-2020

सकाळी 9 वाजता तुळजापूर येथे आगमन

9 ते 9:45 सर्किट हाऊस

9'45 ते10 काकरंबा वाडी कडे

10 ते 10:15 पाहणी

10:15 ते 11:05 सास्तुर कडे

11:05 ते 11:30सास्तुर येथे पाहणी

11:30ते11:40 राजेंगाव कडे

11:40 ते 12  राजेगाव पाहणी

12 ते 12:45 उमरगा कडे

12:45 ते1:40 राखीव

1:40 ते 2:10 कवठा कडे

2:10 ते 2:30 कवठा पाहणी

2:30 ते 3:15 उजनी कडे

3:15 ते 4:45 उजनी पाहणी

3:45 ते 4 पाटोदा कडे

4 ते 4:30 पाटोदा पाहणी

4:30 ते4:50 करजखेडा कडे

4:50 ते 5:15 काराज खेडा पाहणी

5:15 ते 5:40 तुळजापूर कडे सर्किट हाऊस मुक्काम

★दिनांक19-10-2020★

सकाळी 9 ते 9:20 कात्री कडे

9:20 ते 9:50 कात्री पाहणी

9:50 ते10:20 तुळजापूर कडे

10:30 ते 11 पत्रकार परिषद 

11 ते 11:30 राखीव

11:30 ते परांडा कडे प्रयाण

12 ते 2 भोत्रा आणि आवारपिंप्री पाहणी

2 ते 3 राखीव

3 वाजता बारामती कडे प्रयाण


 
Top