उस्मानाबाद, दि. 31 : उस्मानाबाद जिल्हा शिवमल्हार संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील शिवमल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रा.काँ. नेते संजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व कोजागिरी पोर्णिमा निमित्त शनिवार दि. ३१ रोजी उस्मानाबाद येथील कुष्ठधाम येथील गोर गरीब रुग्ना ना केळी सफरचंद आदीसह अल्पोहाराचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवमल्हार संघटनेच्या उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती संगिता ढोकळे, सोलापुरच्या शिव मल्हार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सविता वाघमारे, तालुकाध्यक्षा कविता काळे, सुनिता कोळेकर आदीसह माहिला उपस्थित होत्या.